Farmers Protest: 'मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ पंचांग बघून ठरणार का?', Uddhav Thackeray यांचा सवाल
abp majha web team | 30 Oct 2025 10:18 PM (IST)
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नागपुरात (Nagpur) पुकारलेल्या 'महाएल्गार' आंदोलनामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. 'पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ काय? तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहात का?', असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने, कर्जमाफीसाठी दिवाळीनंतर आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही नागपुरात धाव घेऊन पाठिंबा जाहीर केला. राजू शेट्टी, अजित नवले यांच्यासह अनेक शेतकरी नेते कडूंच्या आंदोलनात सामील झाले आहेत. कडूंच्या या आंदोलनामुळे कर्जमाफीचा मुद्दा महाविकास आघाडीच्या हातून निसटला असून, सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचे सर्वाधिक श्रेय बच्चू कडूंना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.