बाबासाहेब पुरंदरेंचं 100व्या वर्षात पदार्पण, 99 व्या वाढदिवशी बाबासाहेबांनी कोणता संदेश दिला?
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2021 11:50 PM (IST)
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करुन शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. या निमित्ताने पुण्यातील ज्या सोसायटीत बाबासाहेब सध्या राहतायत तिथे अभीष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत.