Baba Siddique Case: सिद्दीकींची हत्या, SRA चा अँगल? झिशान यांच्या जबाबात कुणाची नावं?Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात माजी आमदार झीशान सिद्दिकींचा जबाब चर्चेत आलाय. झिशान सिद्दिकींनी आपल्या जबाबात काही नेते आणि विकसकांची नावं घेतल्यानं एकच खळबळ माजली. इतकंच नव्हे तर आता आपल्या जीवालाही धोका असल्याचा दावा झिशान यांनी केलाय. झिशान यांनी कुणाची नावं घेतली, आपल्या जबाबात त्यांनी नक्की काय म्हटलंय? या प्रकरणात एसआरएचा अँगल काय? पाहूयात...
झिशान सिद्दिकींच्या जबाबात काय?
वांद्रे पूर्वमधल्या संत ज्ञानेश्वर नगर विकास प्रकल्पात लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी आवाज उठवत होतो
प्रकल्पाचा सर्व्हे होण्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांनी तिथल्या लोकांची सभा बोलावली
तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर मी आणेन त्या बिल्डरला मान्यता द्या, असं परबांनी लोकांना सांगितलं
त्यानंतर पृथ्वी चव्हाण नावाच्या बिल्डरनं माझ्याशी संपर्क साधला
इथं राहणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी घर देण्यात येईल, असा विश्वास पृथ्वी चव्हाणनी दिला
जनरल बॉडी ठरावाच्या बैठकीत माझ्यासह पृथ्वी चव्हाण, त्याचा पार्टनर नबील पटेल आणि अनिल परब उपस्थित होते
पण करार वाचताना मात्र रहिवाशांना मुंबईत कुठंही घर दिलं जाऊ शकतं, असं नमूद असल्याचं लक्षात आलं
कुणाच्याही दबावाखाली येऊ नका, असं मी लोकांना सांगितलं
माझ्याविरोधात खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आला
यासंदर्भात बिल्डर पृथ्वी चव्हाणनं माझ्या वडिलांशी बातचीत केली
पृथ्वी चव्हाण यांनी असभ्य भाषेचा वापर करत, 'तुमचं काय मला जे वाटेल ते मी करेन' असं म्हटलं
हत्येच्या दिवशी वडिलांच्या फोनमध्ये मोहित कंबोज यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क झाल्याचं दिसतं
मोहित कंबोजना मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचं होतं
मुंद्रा बिल्डरनं लोकांशी बोलताना माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले होते, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे
वर नमूद केलेल्या सर्व प्रकरणांच्या संबंधांबाबत सविस्तर तपास करण्यात यावा