Ayodhya Shri Ram Mandir : श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर Special Report
abp majha web team | 20 Jun 2023 11:37 PM (IST)
प्रभु श्री राम... या देशाच्या संस्कृतीचा आत्मा...देशातला इतिहास, धर्म, संस्कृती, राजकारण यांच्या केंद्रस्थानी रामाचं नाव कायम राहिलंय. रामाठायीच्या भक्तिभावामुळे देशात लाखो राम मंदिरं आहेत पण रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत मात्र रामाच्या वाट्याला वनवास आला. त्यामुळे राममंदिरासाठी आंदोलन उभं राहिलंय. देशातलं राजकारण ३ दशकं घुसळून निघालं. शेवटी न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. रामभक्तांच्या ५०० वर्षांच्या लढ्याला यश आलं आणि रामाच्या जन्मस्थानी रामललाची मुर्ती विराजमान होताना बघण्याचं भाग्य मात्र आपल्या पिढीला लाभलंय. इतक्या वर्षांची प्रतिक्षा आता फळाला आलीये. लवकरच मनाच्या गाभाऱ्यातला राम आपल्याला अयोध्येच्या गाभाऱ्यात सुद्धा दिसणार आहे. पाहुयात हे राम मंदिर मंदिर आणि प्राणप्रतिष्ठेचा सोहळा कसा असणार आहे.