Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
जगभरातील कोटेवधी रामभक्तांसाठीचा सर्वात मोठा क्षण अवघ्या काही तासांवर आलाय कारण अयोध्येमध्ये भव्य अशा राम मंदिराच काम पूर्ण झाले आणि त्याच मंदिरावर उद्या सकाळी धर्मध्वज फडकवला जाणार आहे. त्याच सोहळ्याची सध्या अयोध्येमध्ये जहियत तयारी सुरू आहे. पाहूया एबीपी माझाच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांनी थेट अयोध्येतून घेतलेला या सोहळ्याच्या तयारीचा हा आढावा. नमस्कार, मी ज्ञानदा कदम आणि माझ्या सोबत आहे कॅमेरामन प्रशांत माने आणि समोर दिसतय ते प्रभू श्रीरामांच अलौकिक मंदिर. प्रभू श्रीरामांच हे मंदिर पूर्ण झालेला आहे आणि आता या क्षणी देशभरातले, राज्यभरातले हजारो भाविक. दर्शनासाठी येतात. उद्याचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे 25 जानेवारी 2025 चा आणि समोर जो उंचच उंच शिखर दिसतय जो कळस दिसतोय त्याच्यावरती धर्मपताका फडकवली जाणार आहे. हा केवळ या मंदिराचा कळस नाहीये तर ही हिंदूंची आस्था आहे. हिंदूंची सकारात्मकता आहे, हिंदूंची ऊर्जा आहे आणि हिंदूंची प्रेरणा आहे. 500 वर्षांचा संघर्ष हे मंदिर पूर्ण होण्यासाठी काहीक पिढ्यांनी पाहिलेला आहे. 500 वर्षांचा संयम सर्वांनी दाखवलेला आहे. ही 500 वर्षांची प्रतीक्षा आहे, ही एक सुरेख अनुभूती आहे आणि या कळसावरती खास लेजर शो सुद्धा दाखवला जाणार आहे तो लेजर शो असणार आहे सीता स्वयंवराचा कारण 25 जानेवारीची तारीख किंबहुना या विवाहाची तारीख इथे का निश्चित करण्यात आली या विवाह पंचमीची कारण प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह या वेळेला झालेला होता म्हणून याच मुहूर्तावरती हा जो कार्यक्रम आहे हे करण्याच निश्चित झालेलं आहे. भगवा ध्वज जेव्हा फडकवला. शौर्याच, संयमाचं, सकारात्मकतेच आणि प्रचंड मोठ्या ऊर्जेच प्रतीक आहे. त्याची एक्सक्लूसिव दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. धर्मध्वजा, धर्म पताका फडकवली जाणार आहे. प्रभू श्रीराम मंदिर पूर्ण झालेला आहे आणि इथे शेकडो हात हे मदतीसाठी पुढे सरचावलेले आहेत, मंदिर सजावटीसाठी.