✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report

abp majha web team   |  15 Dec 2025 08:35 AM (IST)

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एका समुद्रकिनारी दोन हल्लेखोरांनी ज्यू नागरिकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब ही की हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलंय. ऑस्ट्रेलियन प्रशासनानं हा दहशतवादी हल्लाच असल्याचं म्हणत संताप व्यक्त केलाय... पाहूयात या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट....



ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील

गजबजलेल्या बॉन्डी समुद्रकिनाऱ्यावरची ही दृश्य...

रविवारी दुपारी दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी

बॉन्डी बीचवर गोळीबार सुरु केला....

त्यांच्या निशाण्यावर होते सण साजरा करणारे ज्यू नागरिक...


हनुक्का... हा सण साजरा करण्यासाठी

सिडनीतील अनेक ज्यू नागरिक बॉन्डी बीचवर जमले होते...

त्याचवेळी आलेल्या दोन हल्लेखोरांनी एली श्लँझर या ज्यू नेत्याची हत्या केली....

त्यानंतर ज्यूंना लक्ष्य करत गोळीबार सुरु ठेवला...

याचदरम्यान एका व्यक्तीनं हल्लेखोराला पकडलं

आणि त्याच्याकडून बंदूक हिसकावून घेतली...


त्यानंतर पोलिसांनी नवीद अक्रम नावाच्या एका हल्लेखोराला ठार केलं

तर दुसऱ्या हल्लेखोराला ताब्यात घेतलं...

या गोळीबारात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला

या घटनेला दहशतवादी कृत्य मानत ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी संताप व्यक्त केलाय....


'दहशतवादाला थारा नाही'
----------------------------------

"ज्यूंवरचा हा हल्ला प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकावरचा हल्ला आहे. प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकाला यामुळे धक्का बसलाय. आपल्या देशात द्वेष, हिंसाचार आणि दहशतवादाला थारा नाही. आम्ही हा दहशतवाद पूर्णपणे नष्ट करु"

- अँथनी अल्बानीज, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया

महत्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियात गेल्या ३५ वर्षातली

अशा प्रकारच्या सामूहिक हल्ल्याची ही पहिलीच घटना...

त्यामुळे ऑस्ट्रेलियन प्रशासनानं याची गंभीर दखल घेत तपास सुरु केलाय...


दरम्यान या हल्ल्यावेळी

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन शेजारच्याच रेस्टॉरंटमध्ये होता...

त्यानं हल्ला झाला तेव्हा आपण हॉटेलमध्ये बंद करुन घेतल्याचं सांगितलं....

बॉन्डी बीचवरच्या एका रेस्टॉरंटमध्ये बंद असणं हा भीतीदायक अनुभव होता. मी आता घरी सुरक्षित आहे. पण आपत्कालीन सेवा आणि दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तीचे खूप खूप आभार. या हल्ल्यात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली...

पोलिसांनी घटनास्थळाजवळून काही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्यायत...

ऑस्ट्रेलियातील ज्यूंचे अनेक महोत्सव रद्द करण्यात आलेयत

आणि देशभरात हायअलर्ट देण्यात आलाय...

दहशतवाद्यांच्या या हल्ल्यानं ऑस्ट्रेलिया हादरुन गेलाय...

ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report

TRENDING VIDEOS

Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर9 Hour ago

Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका10 Hour ago

Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका11 Hour ago

Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण12 Hour ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.