Aurangabad : लॉकडाऊनमध्ये गवसले सूर; Yuvraj Patel यांची मुलीसह संगीत साधना ABP Majha
abp majha web team | 17 Oct 2021 09:00 PM (IST)

मार्च २०२० च्या अखेरीस देशात कोरोनामुळे लॉकडाऊन सुुरु झाला. या लॉकडाऊनमुळे आपण सर्वच घरात अडकलो. या काळात कुणी नवनव्या रेसीपी बनवल्या, कुणी इंटरनेटवर मिम बनवले. तर, काहींनी निव्वळ आराम केला. मात्र, याच लॉकडाऊनच्या वेळेचा सद्उपयोग करुन औरंगाबादमधील युवराज पटेल आणि साक्षी पटेल या बाप आणि लेकीनं स्वत:मधला कलाकार गवसला आहे.