Aurangabad Lockdown : कोरोना, लाॅकडाऊनमुळे अर्थचक्र बिघडल्यानं औरंगाबाद विभागातील 5000 उद्योग बंद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी 29 जुलै) महत्वाची बैठक झाली. यात राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल करण्याविषयी चर्चा झाली आहे. निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.
राज्यात लागू असलेल्या निर्बंधामध्ये काही शिथिलता आणली पाहिजे यासाठी आम्ही अहवाल सादर केला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवारपैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल.