Aurangabad Bridge Special Report : अक्कलशून्य नियोजनाचा अजब नमुना, कमी उंचीच्या पुलाला कोण जबाबदार?
abp majha web team | 10 Jan 2023 10:43 PM (IST)

बातमी औरंगाबादहून..औरंगाबादच्या बीड बायपास रोडवरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी या बायपासचे रुंदीकरण आणि सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी केली.अर्थात या उड्डाणपुलासाठी औरंगाबादकरांना संघर्ष करावा लागला..तीन वर्षानंतर हा उड्डाणपूल तयार झाला खरा, पण आता याची उंची कमी असल्याचं समोर आलंय..आता ही चूक कुणामुळे झाली आणि ती कशी सुधारली जाते पाहूया या रिपोर्टमधून...