Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report

भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा आज समोर आला... आपल्या भक्तांना फसवण्याची एकही संधी हा ठकसेन सोडत नव्हता, असं दिसतंय... संपूर्ण शाकाहारी असलेल्या अनेक भक्तांना तो चक्क वनस्पती आहे असं सांगून नॉनव्हेज खायला घालायचा... एवढंच नव्हे, तर शेतकऱ्याची जमीन हडपल्याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यानं आता आयकर खात्यालाही हातोहात गंडवल्याचं समोर आलंय... बघुयात भोंदूबाबा कारनाम्यांचा पंचनामा करणारा हा स्पेशल रिपोर्ट...
हा मासा नाहीये, तर पाण्यातली एक वनस्पती आहे... असं कुणी म्हणालं, तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल...
पण भोंदूबाबा अशोक खरातच्या भक्तांचा मात्र त्यावर विश्वास बसायचा म्हणे...
'प्रसाद' म्हणून तो चक्क मासे वाटायचा अन् शाकाहारी किंवा जैन भक्तांना ती वनस्पती असल्याची 'गोळी'ही द्यायचा...
खरात गजाआड आहे...पण त्याचे दररोज नवनवे कारनामे मात्र समोर येतायत...
भक्तांना गंडा घालणाऱ्या खरातनं शेतकऱ्याची जमीनही हडप केल्याचं समोर आलंय...
शिर्डीत एका सामान्य शेतकऱ्याची जमीन हडपल्याप्रकरणी खरातसह पाच जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल झाला...
त्यानंतर बुधवारी साकुरी येथील व्यावसायिक अरविंद बावके आणि शिर्डीचा हॉटेल व्यावसायिक किरण सोनवणे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या...