Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report

Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर भोंदू बाबा अशोक खरादवर आतापर्यंत दाखल झालेल्या 11 गुन्ह्यांपैकी दुसऱ्या प्रकरणांमध्ये त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी पार पडली यावेळी कोर्टात नेमकं काय झालं बघूया हा स्पेशल रिपोर्ट. एका प्रकरणाचा बुधवारी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर भोंदू बाबा अशोक खरादला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. खरादच्या वासनांचा शिकार ठरलेल्या एका महिलेनं केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी अधिक तपास आणि खरादची चौकशी करायची असल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकीलांनी केली. गुरुवारच्या सुनावणीला खराद प्रत्यक्ष हजर नव्हता तर तो ऑनलाईन सुनावणीत सहभागी झाला. तांत्रिक कारणानं काहीशी उशीरा सुनावणी सुरू झाली आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरादच्या कोठडीची गरज काय ते न्यायालयाला सांगितलं. खरादच्या अत्याचारांमुळे सदर महिला गर्भवती राहिली असून खराद नंच गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणल्याचा युक्तिवाद एडव्होकेट बागडे यांनी केला. खरादनं हे औषध कुठून आणलं याचा तपास करायचा आहे असाही त्यांनी नमूद केलं. तू अप्सरा आहेस असं सांगून खराद महिलांना भुलवायचा आणि त्यांचं शोषण करायचा तसंच पीडितांकडे खराद आधार कार्ड पॅन कार्ड का मागायचा याचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकीलांनी न्यायालयाला सांगितलं. आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी हा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी 14 दिवसांची पोलीस कोठडी झाली असल्यामुळे पुन्हा सात दिवसांच्या कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद एडव्होकेट भाटे यांनी केला. त्यावर खरादचे गुन्हे अत्यंत गंभीर असल्याचं सरकारी वकीलांनी सांगितलं. न्यायाधीशांनी तुम्हाला काही सांगायचं आहे का असा प्रश्न खरादला केला. त्यानं हात जोडून नाही असं सांगितल्यानंतर न्यायाधीशांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यामध्ये आम्ही अ बाजू मांडलेली आहे आणि त्यावरून आरोपीचा आम्हाला सात दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे. सदर गुन्हा हा संवेदनशील असल्यामुळे मला त्यातला फॅक्ट्स डिस्क्लोज करता येणार नाहीत. परंतु सदर गुन्ह्यामध्ये सात दिवस आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याचा सखोल तपास सुरू आहे. सदर गुन्हा गांभीर्य असल्यामुळे कोर्टाने मला आठ दिवस आठ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे गांभीर्य असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. थँक्यू पण तपासात सहकार्य करत नसल्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही संसंवेदनशील असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. खरादच्या लैंगिक अत्याचारामुळे गर्भपात करावा लागल्याचं हे एक प्रकरण म्हणजेच हिमानगाचं टोक असावं अशी शंका तपास यंत्रणांना आहे. असं करत नाही किती महिलांचा गर्भपात केला आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे तो सुरुवातीला काही महिलांना गुंगीचा औषध द्यायचा आणि त्यांच्यावरती लैंगिक शोषण करायचा त्यानंतर त्यांना वेदना कमी करण्यासाठी औषध द्यायचा त्याचसोबत गर्भपात करण्यासाठी देखील काही औषध द्यायचा त्यामुळे आता प्रश्न उपस्थित झालाय की ही औषध उपलब्ध कुठून व्हायची सूत्रांच्या माहितीनुसार हे काही डॉक्टरांची देखील तीन डॉक्टरांची एसआयटी कडून चौकशी झाली आहे त्यामुळे आता ही चौकशी कुठे झाली आणि हे डॉक्टर कोण होते त्यांची नाव काय आहेत ते अद्यापही समोर आलं नाही पण आता याची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खरादला आणखी सात दिवसांची कोठडी मिळाल्यामुळे चौकशी झालेल्या डॉक्टरांचा यात किती हात होता ते समोर येऊ शकेल मात्र आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांप्रमाणे ज्याला देवाचा अवतार मानलं जातं असे डॉक्टरही खरादच्या कळपात असल्याचं समोर आलंय ज्यांनी जीव वाचवायचा तेच भोंदू बाबाच्या नादी लागून कुणाच्या जीवाशी खेळायला लागले तर मग विश्वास कुणावर ठेवायचा हाही प्रश्नच आहे.