Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report

भोंदू मांत्रिक अशोक खरात तर तुरूंगाची हवा खातोय... मात्र त्याच्या काळ्या धंद्यात पार्टनर असणाऱ्यांचं काय? हे पार्टनर नेते आहेत?, बडे अधिकारी आहेत? की आणखी कुणी? या प्रश्नाचं देखील लवकरच उत्तर मिळणार आहे... कारण अशोक खरातच्या मोबाईलचं क्लोनिंग करण्यात आलंय.. आणि लवकरच त्याच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात येणार आहे.. आता अशोक खरातचा मोबाईल कुणाकुणाची पोलखोल करतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल..
खरातचा मोबाईल कुणाची पोलखोल करणार?
अशोक खरातच्या मोबाईलचं क्लोनिंग पूर्ण झाल्याची माहिती रविवारी न्यायालयाला देण्यात आली
त्यानं काही नंबर वेगळ्या नावानं सेव्ह केलेत
लपवाछपवी करण्याच्या हेतूनेच अशोक खरातनं ही शक्कल लढवल्याचा पोलिसांना संशय आहे
मेसेज पाठवण्यासाठीही अशोक खरात विशिष्ट कोर्डवर्डचा वापर करत होता
मोबाईलमधला डेटा मिळाल्यानंतर खरातनं केलेल्या आर्थिक व्यवहाराचा नव्यानं तपास करता येणार आहे...