Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report

abp majha web team  |  03 Apr 2026 11:25 PM (IST)
ABP News

Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


भोदू बाबा अशोक खराद याचे नेमके कोण कोण त्या नेत्यांशी आणि किती घनिष्ठ संबंध आहेत याबाबत बरेच दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यामध्ये आज भर पडली ती अंजली दमाणी यांनी केलेल्या आरोपामुळे खरादचा कॉल डेटा रेकॉर्ड आपल्या हाती आल्याचा दावा करत त्यांनी कुणाला किती वेळा फोन केले याची यादीच त्यांनी सादर केली यामुळे रूपाली चाकणकरांच्या जोडीनं आता अनेक नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे बघूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट रूपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल हे अशोक खरातांना झाले रूपाली चाकणकरच दोन नंबरच्या आरोपी आहेत महिला आयोगांना बडतर्फ करून किंवा त्यांना अध्यक्ष पदावरून हटवून होणार नाही ज्या बाया त्याच्या शिकार झाल्या त्यांना पहिल्यांदा हे केलं पाहिजे शिक्षा अनेक गुन्ह्यांचा साम्राज्य चालवणाऱ्या खरादच्या कारनाम्यांचा नवा बॉम्ब सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणी यांनी टाकलाय खरादच्या मोबाईलचा सीडीआर हाती लागल्याचा दावा करत दमाणी यांनी अनेक नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला खरादशी मोबाईल वरून वारंवार बोलणाऱ्यांमध्ये रूपाली चाकणकरांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यंत अनेक यांची नाव आहेत त्याची यादीच दमाणी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली त्यामध्ये रूपाली चाकणकरांची बहिण प्रतिभा चाकणकरांचे 236 कॉल दीपक केसरकर यांचा निकटवर्ती दीपक लोंढेचे 189 कॉल रूपाली चाकणकरांचे 177 कॉल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे 17 कॉल सुनील तटकरे यांचे आठ कॉल आशिष शेलार यांचा एक कॉल तर मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही कॉल असल्याचं समोर आलंय रूपाली चाकणकर म्हणायच्या की माझे गुरु आहेत अशोक खराद आणि खराद यांच्याबद्दल मला बाकी काहीच विशेष माहित नाही आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वगैरे वगैरे रूपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल हे अशोक खरातांना झाले एवढंच नाही तर त्यांची बहिण प्रतिभा चाकणकर जे दोन दिवस झाले आपण त्यांच्याबद्दल ही बरच ऐकतोय त्यांचे 236 कॉल हे अशोक खरातांना झाले आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोन वरन झाले होते आता WhatsApp किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही पण 17 कॉल पैकी 10 इनकमिंग आणि सात आउटगोइंग कॉल होते ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं अंजली दमाणी यांनी एकनाथ शिंदेचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या पक्षाचे मंत्री उत्तर देण्यासाठी सरसावले अरे शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना मला किंवा अन्य काही नेत्यांना अनेक लोक दिवसातून फोन करत असतात म्हणून आम्ही काय प्रत्येकाचा काय कॉल रेकॉर्ड ठेवत नाही ठीक आहे आता चौकशी जी आहे ती चौकशी होईल आणि सत्य लोकांच्या समोर येईल फोन करणं काही चुकीचं आहे का काही गुन्हा आहे का मला सांगा ते आता त्या खराद विषयी कुणाला काही कल्पना नव्हती हा माणूस कसला आहे कसा आहे 100% जे जे त्या गुन्ह्यामध्ये संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे म्हणून तर थोडा वाट तर पाहिली पाहिजे कशाचे फोन होते का होते अनेक बरोबर माझ्याबरोबर फोटो आहेत याचा अर्थ मी गुन्हेगार जर असेल तर मलाही जेलमध्ये गेलं पाहिजे ना मी पण मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका भयानक गुन्हे करणारा हा पहिला गुन्हेगार असावा म्हणून त्याच्यावर एवढी कडक कारवाई झाली पाहिजे ही जशी सगळ्यांची इच्छा आहे तशी आमची सुद्धा इच्छा आहे दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेनी दमाणी यांना या प्रकरणी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय फोन करणे किंवा कधी भेट होणे याच्यामध्ये काही गुन्हा नसतो त्याच्यात त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का त्यांना काही प्रत्यक्ष संबंध आहे का त्यांच्या मालमत्ता जे काही आहे त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत कोणी कुणाला फोन केला किंवा कोणी कुणाला भेटला याच्यामध्ये आर्थिक संबंध काय अ ज्या गोरी कृत्या त्याच्यात संबंध काय किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का यावर त्याठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो या प्रकरणाचा चाकणकरांचं महिला अध्यक्षपद आणि पक्षातलंही पद गेलं त्यांना सहआरोपी करण्याची मागणी सातत्यानं केली जाते रूपाली चाकणकरच दोन नंबरच्या आरोपी आहेत हे वारंवार कृतीतून येणाऱ्या सगळ्या याच्यातून ही दिसते तर मग का रूपाली चाकणकरच दर बिनदिक्कत एसआयटीला जाणारच नाही आणि आजही ती सांगते एसआयटीची कुठलीही माझ्याकडे इन्क्वारी लागली नाही तर कोण तिला वाचवतंय आणि जर त्या आल्या तरच ते सगळं अ जे काही घडलंय ते कळेल महिला आयोगांना बडतर्फ करून किंवा त्यांना अध्यक्ष पदावरून हटवून होणार नाही तर त्या आणि त्यांच्यासह त्यांच्या लेवलच्या कारण आता हे फार असतं ना आपल्याकडे तर या पद्धतीने ज्या बाया त्याच्या शिकार झाल्या त्यांना पहिल्यांदा अ हे केलं पाहिजे शिक्षा त्याचवेळी खरादकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांनाही शिक्षा झाली पाहिजे असं दमाणी यांचे म्हणणं आहे सुशिक्षित स्त्रिया ज्या स्वेच्छेने गेलेल्या आहेत त्यांच्याच बद्दल मी बोलते आहे सगळ्या प्रकारच्या स्त्रिया त्याच्या नादी लागतात तर याला आळा घालण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की अ माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तेच गृहमंत्री आहेत त्यांनी आज जरा जातीनं लक्ष घालावं आणि स्त्रियांना कठोर शिक्षा द्यावी हीच माझी मागणी आहे तर रूपाली चाकणकरांसह संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे आणि फक्त खराद किंवा चाकणकर विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन चालणार नाही या बाबाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात बाबाला मोठं करण्यात बाबाचा प्रचार प्रसार करण्यात जे जे कोणी पुढारी राजकीय असतील सामाजिक असतील कोणत्याही क्षेत्रातले असो ज्या ज्यांचा त्यात सहभाग होता त्या सगळ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे हा आग्रह आपण धरला पाहिजे अंजली दमाणी यांच्या सीडीआर बॉम्बमुळे आता खराद प्रकरणात आणखी कोणतं नवं वादळ येतंय ते पाहायला हवं  

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA