Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप

सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना आज अखेरचा निरोप देण्यात आला... दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.. यावेळी देशभरातील राजकीय नेते, सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.. आशाताईंच्या अंत्यदर्शानाला आलेल्या कित्येक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते आणि अनेक दिग्गजांना भावना अनावर झाल्या… पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....
((सुदेश भोसलेंचा आवाज आणि त्यावर आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराचे व्हिज... त्यात आशाताईंचे फोटो))
आशा भोसले गेल्या...
आणि संगीतविश्वातील एका पर्वाचा अस्त झाला...
((व्हिज्युअल मोंटाज....))
सोमवारी सकाळी आशाताईंचं पार्थिव
लोअर परळमधल्या त्यांच्या निवासस्थानी
अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं
यावेळी अनेक मान्यवरांनी आशाताईंचं अंतिम दर्शन घेतलं....
((वाईप - अलविदा आशाताई ))
संगीतकार एआर रहमान आज सकाळी
आशा भोसलेंचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईत पोहोचले...
((व्हिज...))
१९९०च्या दशकात एआर रहमान यांच्या आधुनिक संगीताला
आशा भोसलेंच्या आवाजाची जोड मिळाली
आणि त्यांनी भारतीय संगीतविश्वाला अनेक सुपरहिट गाणी दिली....
((रहमानचे व्हिज...))
((R MUM SURAJ LIVE 830AM 130426
R MUM VEDANT LIVE 830AM 130426))
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर
आणि मंगेशकर घराण्याचं एक वेगळंच नातं आहे...
आशाताई गेल्यानंतर सचिन आपल्या पत्नीसह
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला...
यावेळी आशाताईंच्या कुटुंबीयांशी बोलताना
सचिन भावूक झालेला दिसला....
((व्हिज्युअल्स....))
उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरेंसह
आशा भोसलेंच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले
तेव्हा रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते....
((व्हिज्युअल्स...))
अभिनेता रितेश देशमुख आणि सचिन पिळगावकर यांनी
आशा भोसलेंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं
यावेळी रितेश यांनी आशाताईंची नात जनाई
आणि कुटुंबीयांचं सांत्वन केलं
((व्हिज्युअल्स...))
त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही
आशा भोसलेंच्या अंत्यदर्शनाला पोहोचले...
((व्हिज्युअल्स...))
अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले,
हरिहरन, उदित नारायण यांच्यासह
गायनक्षेत्रातली दिग्गज मंडळीही
आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचली होती...
((व्हिज्युअल्स....))
अखेर दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास
आशा भोसलेंचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी दादरमधील
शिवाजी पार्क स्मशानभूमीकडे मार्गस्थ झालं...
((व्हिज्युअल्स....))
दादर स्मशानभूमीमध्ये
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेक नेतेमंडळी, संगीत विश्वातील अनेक मान्यवर
आणि विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते....
((व्हिज्युअल्स))
आमीर खान, विकी कौशल यांनीही
दादर स्मशानभूमीत उपस्थित राहून
आशाताईंचं अखेरचं दर्शन घेतलं...
((व्हिज्युअल्स....))
आशाताईंच्या आठवणींना सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी उजाळा दिला.
प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांनीही सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आशाताईंसोबतच्या आठवणी जागवल्या
यावेळी दादर स्मशानभूमीत
आशाताईंना अंतिम निरोप देतेवेळी
सुदेश भोसले, शान आणि इतर गायकांनी
स्वरसुमनांजली वाहिली.... आणि त्यानंतर त्यांना मुखाग्नी देण्यात आला....
सूरसम्राज्ञी आशाताई अनंतात विलीन झाल्या....
ब्युरो रिपोर्ट... एबीपी माझा
((शेवटी पुन्हा सुदेश भोसलेचा आवाज...मग इतर गायकांची गाणी बॅकग्राऊंडला... आशाताईंचा फेड केलेला फोटो आणि त्यांची चिता जळताना....दी एन्ड))