Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Medicine : कोरोनावर रामबाण औषध! DRDO ने विकसित केलेल्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2021 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : डीआरडीओच्या अँटी-कोविड औषध '2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज'ला अलीकडेच आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी सांगितले की, 11 किंवा 12 मेपासून ही कोविड औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सांगितले की सुरुवातीला किमान 10 हजार औषधाचे डोस बाजारात येऊ शकतात. इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी हे औषध खूप उपयुक्त ठरू शकते.