Antilia Explosives Scare | इनोव्हा कार आहे तरी कुठे? सस्पेन्स वाढला Special Report
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2021 10:20 PM (IST)

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारसह एक इनोव्हा कार देखील आढळून आली होती. या इनोव्हा कारचा चालक दोन वेळा अंबानींच्या घराबाहेर दिसला होता हे उघड झालंय. या कारचालकानं ओळख पटू नये म्हणून पीपीई किट घातलं होतं. या इनोव्हा चालकाचा फोटो एबीपी माझाच्या हाती लागला आहे.