Amit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? निवडणूक लढवणार?
abp majha web team | 15 Oct 2022 11:05 PM (IST)

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आगामी काळात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं सुतोवाच केलंय. आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न समोर येतोय. आतापर्यंत ठाकरे कुटूंब हे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत पाहायला मिळत होतं. मात्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?