मोत्यासारख्या अक्षरात लिहिली 1500 पानं, अडीच हजार नाण्यांचा संग्रह, लेखांची 30 हजार कात्रणं | Special Report
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2020 11:18 PM (IST)

अमरावती जिल्ह्यातील एक शेतमजूर (10 वी पास) असा आहे की तो आवडलेला लेख पुन्हा पुन्हा वाचतो आणि आपल्या मोत्यासारख्या सुंदर अक्षरात हाताने लिहून काढतो. या हस्तलिखितांचा संग्रह बँड करून ठेवतो. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर येथील दिलीप महात्मे असं त्याचं नाव. दिलीपने जवळपास पंधराशे लेख हाताने लिहून काढलेत आणि जवळपास 10 हजार 478 पानांवर जवळपास 30 हजार कात्रणं गोळा करून चिटकवलीत. विशेष म्हणजे या शेतमजुराकडे 151 देश-विदेशातल्या नाण्यांचा संग्रह केलाय. आपली शेतमजुरीचे काम सांभाळून हा युवक सदोदित नव्या प्रयोगाकडे वाटचाल करत आहे.