Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

निमित्त होतं मनसेच्या विद्यार्थी सेनेचा २० व्या वर्धापन दिनाचं...साहजिकच देशातल्या धुमसत्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना होती...आपल्या नेहमीच शैलीत राज ठाकरे बोललेच...पण त्याआधी चर्चा झाली ती राज यांचे पुत्र अमित ठाकरेंची...का, पाहुया या रिपोर्टमध्ये...
जेन-झीशी कनेक्ट होण्यासाठी जाणूबुजून केलेला हा त्यांचा कॅज्युअल अॅप्रोच म्हणावा की अवघडलेपण?...
मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात अमित ठाकरेंच्या भाषणाची वेळ आली...
पण निवेदक निवेदन करत असतानाच अमित ठाकरे उठले...आणि निवेदकाच्या शेजारीच पोडियमर असे रेलून उभे राहिले...
नेहमीची वेशभूषा बाजूला ठेवत अमित ठाकरेंना आज जॅकेट घातलं होतं...
पण भाषणाला उभे राहिल्यानंतर मात्र ते जॅकेट त्यांनी काढून टाकलं...
समोरच्या कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंना चीअर अप केलं जात होतं...
पण अंगावरचं जॅकेट काढलं तरी समोरच्या गर्दीचं ओझं मात्र त्यांच्या मनावर होतं की काय, असा प्रश्न पडला...
अमित ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली खरी...
पण जमलेल्यांचा उत्साह पाहून स्क्रिप्टच विसरले...शब्दांची जुळवाजुळव करताना आंदोलन यशस्वी केल्याबद्दल जेन-झीचं अभिनंदन करणारे आणि वडिलांचं कौतुक करणारे दोन-चार वाक्य ते बोलले...
पण समोरच्या उत्साहामुळे भारावून गेलेल्या अमित ठाकरेंंना बोलण्यासाठी शब्दच सापडत नव्हते...त्यामुळे ते पोडियमवरू मंचावरून बाजूला गेले...
राहिलेलं भाषण पूर्ण करण्यासाठी अमित ठाकरे परतले...
पण ते काय बोलले त्यापेक्षा त्यांनी स्टेजवर काय काय केलं, याचीच जोरदार चर्चा झाली...