Allu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special Report
abp majha web team
Updated at:
13 Dec 2024 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAllu Arjun Gets Bail : सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई
बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवणारा अल्लू अर्जुन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला कारण पुष्पा २ हा सिनेमा आहेच सोबतच त्याच्यावर झालेली अटकेची कारवाई सुद्धा कारणीभूत आहे. एकीकडे फायर है म्हणणाऱ्या पुष्पाच्या सिनेमाला प्रेक्षकांची गर्दी होतेय. तर दुसरीकडे त्याच पुष्पाच्या अटकेसाठी पोलिसांचा ताफा त्याच्या घरी पोहोचला. पुढे काय झालं पाहूया या रिपोर्टमधून..
'झुकेगा नहीं' म्हणणारा पुष्पा अडचणीत
थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक
अटकेनंतर काहीच वेळात अल्लू अर्जुनला जामीन
तेलंगणा हायकोर्टाकडून अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन
अल्लू अर्जुनला अटक का?
- ४ डिसेंबरला 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रीमिअर शो दरम्यान चाहत्यांची गर्दी
- थिएटर बाहेर चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू
- मृत महिलेच्या नातेवाईकांना अल्लू अर्जुनकडून २५ लाखांची मदत
- चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल
- अल्लू अर्जुनला अटक
- अटकेनंतर कनिष्ठ कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- तासाभरात तेलंगणा हायकोर्टाकडून अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर