All About Vaccination :लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची? लस कुठे आणि कशी मिळेल? हवी ती लस घेता येईल का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2021 10:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यात आज 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.