Akshay Shinde Encounter : नराधम अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, आरोपांची फायरिंग Special Report

Continues below advertisement

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेंचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. त्यानंतर योग्य न्याय झाला म्हणत एकीकडे जल्लोष साजरा केला जातोय. तर दुसरीकडे विरोधकांनी यावरून सरकारवरच आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केलीय. एन्काऊंटरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत...त्याची उत्तरं मिळणार का हादेखील एक प्रश्नच आहे...पाहुयात याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट...



Continues below advertisement








बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर झालं.
मात्र त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा गोळीबार सुरू झालाय.




अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमागे असणारी कहाणी पोलिसांनी पत्रक काढून प्रसिद्ध केली
आणि त्यानंतर सकाळपासूनच विरोधकांनी ओळीनं पत्रकार परिषदा घेतल्या 
आणि एन्काऊंटरचं पोस्टमॉर्टेम करायला सुरूवात करत प्रश्नांची सरबत्ती सुरू केलीय..
.
या विरोधकांमध्ये आघाडीवर आहेत त्या ठाकरेंच्या मुलुखमैदानी तोफा
एक म्हणजे संजय राऊत आणि दुसऱ्या सुषमा अंधारे...


 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola