अकोल्यात भन्नाट पद्धतीनं जपलं जातंय चिमण्यांचं अस्तित्व,निसर्ग कट्टा संस्थेचा अभिनव उपक्रम!
उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Updated at:
21 Mar 2021 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWorld Sparrow Day : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील अनेक जाती तर इतिहासजमा झाल्या आहेत. 'पासर डोमेस्टीकस' (Passer Domesticus) अर्थातच 'हाऊस स्पॅरो' (House Sparrow) ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे.