Ajit Pawar vs Chhagn Bhujbal यांच्यात सुप्त संघर्ष? 16 वर्षांचा हिशोब चुकता? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी व्यक्त केेलेली खदखद अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. त्यानंतर चर्चा झाली ती भुजबळांना अजितदादांनी मुद्दामहून डावलल्याची. पण अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये याआधीपासून एक सुप्त संघर्ष असल्याचं बोललं जातं. तो संघर्ष होता उपमुख्यमंत्रीपदावरुनचा... त्या संघर्षामुळे भुजबळांना मंत्रीपद मिळालं नाही का? पाहूयात हा खास रिपोर्ट...
साल १९९९...
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली...
त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुका पार पडल्या...
काँग्रेससोबत नव्यानं निर्माण झालेली राष्ट्रवादीही
सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाली...
महत्वाचं म्हणजे पक्षाचा जनाधार वाढावा यासाठी शरद पवारांनी
छगन भुजबळांना थेट उपमुख्यमंत्रीपदावर बसवलं...
भुजबळ राष्ट्रवादीचे पहिले उपमुख्यमंत्री बनले....
याच मंत्रिमंडळात शरद पवारांचे पुतणे
अजित पवारही होते...
अजितदादांच्या राजकीय महत्वाकांक्षांना
या काळात धुमारे फुटू लागले होते...
आणि राज्याचं उपमुख्यमंत्रीपद मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु होते...
त्यामुळे दोन दशकांपूर्वीत भुजबळ आणि अजित पवारांच्या
सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती...
या दोघांसाठीही उपमुख्यमंत्रीपदाची संधी चालून आली
ती २६/११ च्या हल्ल्यानंतर...
२००८ च्या त्या संघर्षात अनुभवी छगन भुजबळ वरचढ ठरले...
भुजबळ दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले...
त्यामुळं नाराज झालेले अजित पवार पुढचे काही दिवस नॉट रिचेबल झाले...
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं...
अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांनी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली...
अजित पवारांचे विश्वासू विलास लांडेंनी
पक्षाच्या आमदारांच्या सह्यांची मोहीम सुरु केली...
बहुतांश आमदारांनी अजित पवारांच्या नावासमोर साह्या केल्या...
त्यामुळे भुजबळांना बाजूला करुन अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याशिवाय
शरद पवारांसमोर पर्याय राहिला नाही...
११ नोव्हेंबर २०१०...
पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात
अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली...
त्यानंतर देवेंद्र फडणवीस,
उद्धव ठाकरे,
एकनाथ शिंदे,
आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात
अजित पवार उपमुख्यमंत्री बनलेयत...
मात्र आता राष्ट्रवादीची कमान ही अजित पवारांकडेच असल्यानं
अनुभवी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे...
अजित दादांनी करेक्ट कार्यक्रम करत १६ वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता केलाय...