Ajit Pawar Special Report : शरद पवारांच्या वयाचं कारण देत अजित पवारांचं राजकारण
abp majha web team | 07 Jan 2024 10:36 PM (IST)

Ajit Pawar Special Report : शरद पवारांच्या वयाचं कारण देत अजित पवारांचं राजकारण
शरदचंद्र गोविंदराव पवार... जन्मतारीख १२ डिसेंबर १९४०... वय ८४ वर्ष... या ८४ वर्षांतील सुमारे ५० वर्ष शरद पवारांनी राजकारण केलं... या सपूर्ण राजकीय कारकीर्दीत शरद पवारांना आजवरच्या इतिहासाती सर्वात मोठा धक्का २०२३ साली बसला... आणि तो धक्का दिला त्यांच्याच रक्ताच्या नातेवाईकाने... अर्थात त्यांचे पुतणे असलेल्या अजित पवारांनी... खरंतर, बंड केल्यापासून अजित पवार शरद पवारांवर टीकेचे बाण सोडतायत... मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या तोंडी एक मुद्दा असतो... आणि तो म्हणजे, शरद पवारांच्या वयाचा... आताही दादांनी शरद पवारांचं वय काढलंय... आणि त्यावरून वादही सुरू झालाय. एक स्पेशल रिपोर्ट.