✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ajit Pawar Last Rites : बारामतीत मोठे झाले, बारामतीच्या कुशीतच विसावले Special Report

एबीपी माझा वेब टीम  |  29 Jan 2026 10:58 PM (IST)
ABP News

अजित पवार.... म्हणायला गेलं तर एका नावातले हे दोन शब्द... पण या दोन शब्दांमध्ये काय काय सामावलं होतं? हे आज बारामतीकरांनी सगळ्या जगाला दाखवून दिलं... अजितदादांचं अखेरचं दर्शन घेता यावं म्हणून बारामतीकर अक्षरशः धडपडत होता....अजित पवार पंचत्वात विलिन झालेत... पण कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध अजूनही सुरूच आहे... अजित पवारांच्या रूपात कुणी दादा गमावला, कुणी बापमाणूस गमावला तर कुणी आधारवड गमावलाय..
एरवी जनता दरबारासाठी...  किंवा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी...  तर कधी अडलं-नडलेलं काम मार्गी लावण्यासाठी, कार्यकर्ते अजितदादांचं काटेवाडीतलं घर गाठायचे...  मात्र आज गर्दी झाली होती ती लाडक्या अजितदादांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी...
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्याआधी, अजित पवारांचं पार्थिव काही वेळ त्यांच्या काटेवाडीतल्या घरात ठेवण्यात आलं होतं  ज्या काटेवाडीच्या मातीनं अजित पवारांना लहानाचं मोठं केलं...   आज तीच काठेवाडी धाय मोकलून रडत होती...  कारण अजितदादांच्या रूपात त्यांनी आधारवड गमावलाय....
बारामतीचा असा एकही रस्ता नसेल जो अजितदादांच्या पायाखालून गेला नसेल...  कधी प्रचारासाठी  कधी विकासकामांच्या पाहणीसाठी...  तर कधी कार्यकर्त्याच्या घरातील सुख-दुखाच्या प्रसंगात सहभागी होण्यासाठी  पायाला भिंगरी लावून अजित पवारांनी बारामती कितीवेळा पालथी घातली असेल याची गणनाच नाही...  मात्र त्याच बारामतीच्या रस्त्यावरून अजित पवारांचा आज अखेरचा प्रवास पाहताना, हजारो बारामतीकरांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं..
स्वच्छतेसाठी आग्रही असणाऱ्या अजितदादांचा, विद्या प्रतिष्ठानमधील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा ओरडा खाल्लाय...  मात्र आता जाब विचारणारा आवाजच काळाच्या पडद्याआड हरवाय 
बारामतीत असताना अजितदादांचा विद्या प्रतिष्ठानमधला फेरफटका कधीच चुकला नाही...  मात्र त्याच विद्या प्रतिष्ठानच्या कुशीत अजितदादा कायमचे विसवणार होते...  अजितदादांना निरोप देण्यासाठी बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लोटली होती
 ज्या नेत्याची राजकीय उंची जास्त, त्या नेत्याच्या राजकीय शत्रूंची संख्याही तेवढीच जास्त...  मात्र अजितदादा याला अपवाद ठरले...  मैत्रीत त्यांनी राजकारण कधीच आड येऊ दिलं नाही...  म्हणूनच अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी सगळ्याच पक्षातले नेते आवर्जून उपस्थित होते...
ट्रिपल इंजिन सरकारमधलं एक इंजिन आता कायमचं थांबलंय  अजित पवारांच्या रूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारमधला एक महत्त्वाचा शिलेदार गमावलाय...  आणि या शिलेदाराला अखेरचा निरोप देताना या दोन्ही नेत्यांच्या डोळ्यासमोरून अजितदादांच्या कित्येक आठवणी नक्कीच तरळल्या असणार..

महाराष्ट्राचे लाडके दादा असणाऱ्या अजित पवारांना अखेरचा निरोप देताना, घरातल्या बहिणींना अश्रू अनावर झाले होते... ज्यानं आयुष्यातली सगळी संकट ढाल म्हणून झेलली...  आयुष्याच्या सुख-दुखात ज्या खांद्याचा सदैव आधार होता...  तो बापमाणूस गमवल्यानंतर जय आणि पार्थ पवार यांच्यावर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल... हे शब्दात मांडता येणार नाही..  आजवरचं सगळं आयुष्य ज्यांची सावली म्हणून वावरली... तो प्रकाशच का हिरावून नेलास? असा प्रश्न निशब्द झालेल्या सुनेत्रा पवार नक्कीच विचारत असणार..    बाहेरून दिसत नसलं तरी शरद पवार नावाचा वटवृक्ष देखील आतून नक्कीच कोलमडला होता....  कारण त्याच्या सावलीत वाढलेलं, बहरलेलं एक मोठं झाडं उन्मळून पडलं होतं..   पवार कुटुंबाचा...  राजकीय मित्रमंडळीचा....  लाडक्या समर्थकांचा..  आणि बारामतीकरांचा, अखेरचा निरोप घेऊन अजितदादा बारामतीच्याच कुशीत कायमचे विसावले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ajit Pawar Last Rites : बारामतीत मोठे झाले, बारामतीच्या कुशीतच विसावले Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.