Shekhar Bagde Case : भाजपप्रमाणेच दादांचाही शिंदेवर आरोप? Special Report

एक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या बदलीवरून शिवसेना भाजपामध्ये वादाच्या ठिणग्या... बरं, या ठिणग्या काही साध्यासुध्या नव्हत्या... तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी मिठाचा खडा असा शब्दप्रयोग करत, खासदारकी सोडण्याचा इशारा दिला होता. आणि हे बोलताना त्यांचा इशारा भाजपकडे होता, हे उघड गुपितय... आता या उघड गुपितामध्ये नवी काडी टाकलीय, अजितदादांनी... महत्त्वाचं म्हणजे, ही काडी भाजपला मदत करणारी, तर शिंदेना टोचणारी, असल्याचं बोललं जातंय... म्हणूनच, भाजप शिवसेनेत वादाचं कारण बनलेला हा अधिकारी कोण? आणि याच अधिकाऱ्याबाबत अजितदादांनी केलेल्या दाव्यांचे अर्थ काय? त्याचसोबत, भाजपच्या खांद्यावर हात ठेवत, शिंदेंवर अप्रत्यक्ष बाण दादांनी का सोडलेत? हे प्रश्न महाराष्ट्राला पडलेत. त्याचीच उत्कर शोधणारा आणि शिवसेना भाजपमधील वादाचा पट उलगडून सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट... पाहूयात...