✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Ajit Pawar Baramati महाराष्ट्राचे दादा हरपले,बहुआयामी व्यक्तिमत्व अजित पवारांचं निधन Special Report

एबीपी माझा वेब टीम  |  28 Jan 2026 11:55 PM (IST)
ABP News

वटवृक्षाच्या सावलीत इतर झाडं मोठी होत नाही म्हणतात... मात्र बारामतीत शरद पवार नावाच्या वटवृक्षाखाली लहानाचं मोठं होत अजित पवारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली... अजित पवार जेवढे सडेतोड होते, तेवढेच मिश्किलही होते... मोठी पदं भुषवताना त्यांचे पाय जमिनीवर कायम राहिले... अजित पवारांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा 
वयोगट कोणताही असो...   विरोधक कोणीही असो..  प्रत्येकाला आपल्या हक्काचा वाटणारा...  माणूस म्हणजे.. अजित पवार
निवडणूक कोणतीही असो..  मंच कुठलाही असो..  हा माणूस बोलयला उभा राहिला..  की  सभा गाजलीच म्हणून समजा...
फक्त विरोधकच नाही तर मित्रपक्षातील नेत्यांनाही दादांनी..  आपल्या धारधार वक्तव्यांनी अनेकवेळा घाम फोडलाय..   बरं, मंचवरच्या नेत्यांनाच नाही तर समोर बसलेल्यांनाही  दादांनी आपल्या भाषणातून चांगलेच फटकारे हाणलेत.
पण असं असलं तरीही दादांवर जनसामान्यांचं प्रेम कायम राहिलंय...  आणि दादांनीही गेल्या तीन दशकांमध्ये   नेता आणि कार्यकर्त्यातलं अंतर कधी मानलं नाही..  म्हणूनच की काय..  दौरा कोणत्याही जिल्ह्यात असो..   अजित पवार कायम सर्वसामान्यांच्या गर्दीनं वेढलेलेच असायचे..
प्रचारात गेलेला दादा थेट कार्यकर्त्यांच्या घरी जेवतो.  कार्यकर्त्यानं वाढलेलं मोठा आवडीनं खातो..  लेकराबाळांसोबत गप्पा मारतो..  म्हणूनच की काय..  थोडा रागीट आणि कडक स्वभाचा दादा..  आपलाच माणूस वाटून जातो..
दादांच्या खवय्येगिरीचा अनुभव मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा आलाय.  आता हेच पाहा ना..   नाना पाटेकरांच्या घरी..   निमित्त होतं गणपती दर्शनाचं...  पण, दादा म्हणजे दादा.  दर्शन झालं..  आणि दादांनी पाटेकरांच्या घरी चांगलाच ताव मारला
कोणत्याही शहराचा दौरा असला..  की दादा तिथल्या स्पेशल चहावाल्याकडे जाणार..  हे जणू गणितंच बनलं होतं.  ते की चहाप्रेमी होते.. हे अवघ्या महाराष्ट्राला माहितीय..  पहाटेच्या अंधारात विकासकामं पाहायाला बाहेर पडणाऱ्या   अजित दादांच्या हातात एक ग्लास चहाचा दिसायचाच..
चहाचे घोट घेत..  अजित पवार अधिकाऱ्यांना कशा कडक शब्दात फटकारे हाणायचे..  हेही महाराष्ट्राला आठवतंय.. 
दादांची जितकी मजबूत पकड प्रशासनावर होती..  तितकाच जीव शेतीवर..  कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल व्हावेत यासाठी अजित पवारांनी..  राजकीय सभांइतकेच कृषी प्रदर्शनं भरवलीएत..  राजकीय भाषणांमधूनही अजित पवारांनी शेतकरी कसा जगेल..  कसा समृद्ध होईल.. अशीची विधानं केलीएत..

तर दादांचा शेतीवर किती जीव होता.  त्याचा पुरावा देणारी ही दृश्य पाहा..    दादांच्या आठवणीत.. एक आठवण आजही कायम आहे...  ती म्हणजे बारामतीच्या वळूची कहाणी..   असा हा सगळ्यांना हसवणारा.  शब्दाचे फटकारे मारणारा..  पण, कामाचा पक्का नेता आज आपल्यातून कायमचा निघून गेलाय.   शरद पवारांच्यासारख्या राजकारणाच्या विद्यापीठात  राजकीय धडे गिरवत..  गावच्या राजकारणातून देशपातळी पोहोचलेला..  असा दुसरा नेता आता तरी होणे नाही...  दादांच्या रूपात महाराष्ट्रानं काय गमावलंय  तर कुणाचीही बिशाद न बाळगता परखड मतं मांडणारा...  कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कान पकडणारा....  सर्वच क्षेत्रातल्या मंडळींशी मैत्री जपणारा...  कार्यकर्त्याच्या प्रेमापोटी त्याचे हट्ट पुरवणारा...  आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना आपलासा वाटणारा नेता गमावलाय...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Ajit Pawar Baramati महाराष्ट्राचे दादा हरपले,बहुआयामी व्यक्तिमत्व अजित पवारांचं निधन Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.