Ajit Pawar CM Special Report : मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा क्लेम, राजकीय वर्तुळात गोंधळ
abp majha web team | 22 Apr 2023 09:25 PM (IST)

Ajit Pawar CM Special Report : मुख्यमंत्री पदावर अजित पवारांचा क्लेम, राजकीय वर्तुळात गोंधळ
राज्याच्या राजकारणात सध्या एकच नाव धुमाकूळ घालत आहे. ते म्हणजे अजित पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगत पूर्णविराम दिला. मात्र, एका मुलाखतीत दादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली..आणि चर्चांना उधाण आलं..गेल्या २० वर्षात अजित पवार ४ वेळा उपमुख्यमंत्री झाले... त्यामुळे दादांकडून वारंवार मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त होत असावी..पाहूया यावरचाच एक रिपोर्ट...