Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

अजित पवारांच्या विमान अपघाताला तीन आठवडे होत आलेत. या अपघाताच्या प्राथमिक अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र ज्या ब्लॅक्स बॉक्सच्या आधारे हा तपास होणार आहे, तो जळालेल्या अवस्थेत असल्यामुळं तपासात मर्यादा येत असल्याचं सांगितलं जातंय. त्यासाठी हा ब्लॅक बॉक्स आता परदेशी पाठवण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. दुसरीकडं एवढ्या दिवसांनंतरही कुठलीही ठोस माहिती समोर येत नसल्यामुळं रोहित पवारांनी खासगी गुप्तहेरांच्या गाठीभेठी सुरु केल्यात. पाहूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
अजित पवारांचा विमान अपघात नेमका कसा झाला?
घात होता की अपघातच होता? याची सगळी उत्तरं तपासातूनच समोर येणार आहेत.
या तपासाचा मूळ आधार आहे तो विमानाचा ब्लॅक बॉक्स.
मात्र हा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत असल्यामुळं डीजीसीएला तपासात अडथळे येत असल्याचं समजतंय.
त्यामुळं हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाण्याची शक्यता आहे.