Ajit Pawar : दादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा, वावड्यांचा बाजार, नेते बेजार Special Report
abp majha web team | 19 Apr 2023 09:33 PM (IST)

अजित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील बेधडक, बिनधास्त व्यक्तिमत्व.... थोरल्या पवारांच्या या पुतण्याने २०१९ मध्ये राष्ट्रवादीलाही चकवलं होतं... आणि पुढे पहाटेच्या शपथविधीनंतर अवघ्या ७२ तासांनंतर याच तेल लावलेल्या पैलवानाने भाजपलाही धोबी पछाड दिला होता... त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही... भाजप, शिंदे गट आणि त्यात आता अजित पवारांची चर्चा, या समीकरणावर सध्या राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य जनतेत चर्चांना उधाण आलंय... तुमच्या पर्यंतही नाना चर्चा पोहचल्या असतील... चला पाहुयात अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे कुठल्या वावड्या उठल्यात....