AI Local Ticket : AI वापरून बनवला लोकलचा 'पास' पण टीसीपुढे नापास Special Report
एआय... अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स... या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सध्या अनेक काम सोपी झालीयत... पण असं असलं तरी एआयचा दुरुपयोगही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलाय. डीप फेक, मॉर्फिंगनंतर आता बनावट लोकल तिकिटंही एआयच्या मदतीनं तयार केल्याचं उघड झालंय. असाच एक प्रकार मुंबईच्या कुर्ल्यामधून समोर आलाय... काय आहे हे सगळं प्रकरण? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
२८ नोव्हेंबर रोजी...
संध्याकाळी ६.४५ वाजता
परळ–कल्याण एसी लोकलमध्ये तिकीट तपासत असताना,
निरीक्षक प्रशांत कांबळे यांनी बोगस तिकीट वापरुन प्रवास करणाऱ्या
तीन महाविद्यालयीन तरुणांना पकडलं...
धक्कादायक बाब म्हणजे एआयचा वापर करुन
त्यांनी चक्क ट्रेनचा बनावट पास काढला होता...
या मुलांनी दाखवलेला बनावट पास
हा तब्बल साडे तीन हजारांचा होता....
असे तीन पास त्यांनी बनवले होते...
महत्वाचं म्हणजे ही तिन्ही मुलं चांगल्या कुटुंबातील आहेत....
पण त्यांनी केलेला खोडसाळपणा चांगलाच नडलाय
कारण त्यांच्यावर कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी
३ वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय...
पण एआयचा वापर करुन ट्रेनचे पास
किंवा बनावट तिकिटं तयार करण्याचा हा प्रकार पहिलाच नाहीये
याआधीही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत....
बाईट - संभाजी यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
याबाबत आता रेल्वे प्रशासनही सतर्क झालंय...
या बनावट तिकीट प्रकरणामुळे
एआय तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कसा होतो हे समोर आलंय.