Ahmedabad Plane Crash : ब्लॅक बॉक्स उघडणार कारण कळणार? तपासाला दिशा मिळणार? Special Report

Ahmedabad Plane Crash : ब्लॅक बॉक्स उघडणार कारण कळणार? तपासाला दिशा मिळणार? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
कुठेही विमान अपघात घडला की त्याचा सविस्तर तपास केला जातो. अपघाताची कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्या कामात सर्वात आधी कानावर येणारा शब्द असतो तो म्हणजे ब्लॅक बॉक्स. नावात ब्लॅक असलं तरी नारंगी रंगाच्या या बॉक्सचा शोध आधी घेतला जातो. कारण या ब्लॅक बॉक्स मध्ये विमानाच्या छोट्यात छोट्या घडामोडींची नोंद होत असते. अहमदाबाद विमानातील ब्लॅक बॉक्स सकाळी सापडला. तपास यंत्रणांसाठी ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का आहे या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. तर विमानाचा ब्लॅक बॉक्स यंत्रणांच्या हाती आलाय. कसा असतो हा ब्लॅक बॉक्स? नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी हा बॉक्स ऑरेंज म्हणजेच नारिंगी रंगाचा असतो. अपघात स्थळी दूरवरून दिसावा यासाठी त्याचा रंग ऑरेंज असतो. विमानाच्या मागील भागात तो असतो. दुर्घटनेच्या काळातही या भागाच तुलनेने कमी नुकसान होतं. ब्लॅक बॉक्स मध्ये दोन उपकरण असतात. एक कॉकपिट वॉइस रेकॉर्डर यातून वैमानिक क्रू यांच्यातला संवाद, ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचना, नेहमीची रेडियो ट्रान्समिशन, इंजिनाचा आवाज. कळतो दुसर डिवाइस असत फ्लाईट डेटा रेकॉर्डर, यात विमान किती उंचीवर, किती वेगाने, कोणत्या दिशेने उडतय याची माहिती असते. हा बॉक्स काही काळ आगीत राहिला तरी सुरक्षित राहतो. एक तासभर 1100 अंश सेल्सियस एवढं प्रचंड तापमान तो सहन करू शकतो. कित्येक महिने पाण्यात राहिला तरीही बॉक्स आणि आतील माहिती सुरक्षित राहते. 20 हजार फूट खोल पाण्याचा दबाव सहन करू शकतो आणि आपली जागा कळावी यासाठी सिग्नल देत राहतो. इन्वेस्टिगेशन टीम असते. हे जेवढे काही पॉसिबल आपण त्याला सिनरियो म्हणू शकतो, दृष्टिकोन म्हणू शकतो, ते पॉईंट लिहितात किंवा त्यांची नोंद करतात आणि मग प्रत्येक पॉईंट वरती चर्चा होते की हा पॉईंट खरोखरच योग्य आहे की हे शक्यच नाहीये मग तो पॉईंट डिस्कार्ड केला जातो. असं करत करत करत करत सगळे पॉईंट सोडून मग एकाच पॉईंटला शेवटी येतात की हाच फक्त एक जो मुद्दा आहे याच्यामुळे अक्सिडेंट झाला असावा. एप्रिल पासून भारतात ब्लॅक बॉक्स अनालिसिस करण्याची लॅब सुरू झाली. त्याचीही मदत तपास कामात घेतली जाईल. या ड्रीमलाइनर विमानाचा आयुष्य साधारण 40 वर्ष असत. काल अपघात झालेल हे विमान केवळ 15 वर्षांच होत. म्हणजे हे विमान एक प्रकारे तरुण असल्याचं तज्ञ सांगतायत.