Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुंबईतील कार्यक्रमातील पाहुण्यांवरुनही वाद पेटलाय.. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. त्यात सेलिब्रिटीही होते.. जसं पहिल्या दिवशी अभिनेता सलमान खान होता.. तसं दुसऱ्या दिवशी अभिनेता जॅकी श्रॉफ, विकी कौशल, शिल्पा शेट्टीसह गायक अदनान सामीही होता.. आणि नेमकं याचं पाहुण्यांवरुन विरोधकांनी जोरदार टीका सुरु केलीय.. पाहुयात..
कार्यक्रम संघाचा.. निमंत्रण संघाचं.. पाहुणे संघाचे..
आणि आगपाखड विरोधकांची..
दोन दिवसांपूर्वी मुंबईत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शताब्दीनिमित्त
दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं...
त्यात गायक अदनान सामीलाही निमंत्रण होतं..
त्याच कार्यक्रमानंतर त्यानं संघाचे आभार मानत..
एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली..
नेमकं त्यावरुनच पहिली टीका केली ती संजय राऊतांनी..
((राऊतांचा वार, अदनानचा पलटवार))
माझ्या प्रिय संजय, तुम्ही ज्या पद्धतीने
हार्मोनियम वाजवता, त्यासाठी तुमच्या
वडिलांना दोष देणे माझ्याकडून
अत्यंत चुकीचे ठरेल. तुम्हाला शिकवायला
मला आनंदच होईल.
मी राजकारणी नाही;
मी एक संगीतकार आहे,
जो आपल्या गाण्यांतून प्रेम पसरवतो.
म्हणून जो मला प्रेम देतो,
त्याच्यावर मी प्रेम करतो..
मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो…
पुढच्या वेळी प्रेमाचा मार्ग निवडा… एवढंच!
जय हिंद आणि जय महाराष्ट्र!
All Shows


































