Government School : सरकारी शाळांमधील प्रवेश9 टक्क्यांनी वाढले, कोरोना काळात सरकारी शाळांकडे मुलांची धाव
abp majha web team | 18 Nov 2021 11:36 PM (IST)
मुंबई : खासगी शाळांची पालकांना असलेली भुरळ करोनाकाळात ओसरल्याचे चित्र असून, खासगी शाळांतून शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत वाढले आहे. राज्यात शासकीय शाळांमधील विद्यार्थीसंख्या साडेनऊ टक्क्य़ांनी वाढली, तर देशपातळीवर हे प्रमाण सहा टक्के आहे, असे ‘असर’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.