Disha Salian Special Report :'त्या' दिवशी आजोबांचं निधन,दिशा मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंनी मौन सोडलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात भाजप आणि शिंदे गटानं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पुन्हा रान उठवलंय. लोकसभेत राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू नावानं आलेल्या ४४ कॉल्सविषयी प्रश्न उपस्थित केला. आणि मग दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी चौकशीची मागणी लावून धरली. त्याच पार्श्वभूमीवर या मुद्यावर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपलं मौन सोडलंय. त्या दिवसांत माझ्या आजोबांचा मृत्यू झाला होता, असं आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. पण आदित्य ठाकरेंच्या स्पष्टीकरणावरही नितेश राणे आणि रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पाहूयात एबीपी माझाचा रिपोर्ट.