Thane Politics Special Report : ठाण्यात कार्यकर्ते भिडले, नेते चिडले, ठाण्यातलं 'बदला'पूर
abp majha web team | 06 Apr 2023 04:20 PM (IST)

फ..ड..तू..स.. या चार अक्षरी शब्दाभोवती सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय... तेही एका पोस्टमुळे.. ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंनी फेसबुकवर एक पोस्ट केली.. आणि त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदेंना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. आणि यानंतर राज्यात सुरु झालं फडतूस राजकारण...उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना फडतूस शब्द वापरला आणि त्यानंतर भाजप आक्रमक झालीय.