नागपुरात एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आजीसह भावाची हत्या करून आरोपीची आत्महत्या | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Dec 2020 10:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूर : एकतर्फी प्रेम किती घातक वळणावर जाऊ शकते आणि वेळीच मुलींना होणाऱ्या त्रासाची पोलिसांकडे तक्रार केली नाही, तर किती भयावह परिणाम होऊ शकतात याची प्रचिती काल नागपुरात आली आहे. एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि 10 वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या 65 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.