✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Aamir Khan Love Story | वयाची साठी, प्रेमाच्या गाठी; अमिरची नवी गर्लफ्रेंड कोण? Special Report

abp majha web team  |  14 Mar 2025 10:37 PM (IST)
ABP News

सुपरस्टार आमिर खानचा आज ६०वा वाढदिवस.. आज धुळवड असल्यानं माध्यमांसोबत त्यानं कालच वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशन दरम्यान आमिरनं मोठी कबुली दिली. माझं हृदय तिसऱ्यांदा एका स्रीमध्ये गुंतलंय असं आमिरनं प्रांजळपणे कबूल केलंय.. नेमकी कोण आहे ही भाग्यवान स्त्री, ती कुठल्या क्षेत्रात काम करते.. हे सगळं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. 


 


आमिर खान... मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून त्याची ओळख...


आमिर जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो...तितकाच त्याच्या  


रिलेशनशिप्सचीही चर्चा होते...


आता वयाच्या साठीत तो तिसऱ्यांदा प्रेमात पडलाय...


याची कबुली त्यानं स्वत:च दिलीय... 


गुरुवारी मुंबईच्या ताज लँड्स एणड हॉटेलमध्ये आमिरनं माध्यमांसोबत त्याचा वाढिदवस साजरा केला. 


यादरम्यान त्यानं त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली.. गौरी स्प्रॅट असं तिचं नाव आहे.. 


पण ही गौरी नेमकी आहे कोण याची अनेकांना उत्सुकता आहे.. 


GFX IN 
गौरी ही तामिळ आणि आयरिश मिश्र वंशाची आहे 


तिचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, तर आईचं बंगळुरूत फॅशन सॅलोन होतं 


तिचं लहानपण बंगळुरूत गेलं, नंतर ती शिक्षणासाठी लंडनला गेली 


University of the Arts, लंडनमधून तिनं फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये पद्व्युत्तर शिक्षण घेतलं 


२००७ पासून ती मुंबईत बी-ब्लंट नावाचं उच्चभ्रू सॅलोन चालवते 


तिला एक सहा वर्षांचा मुलगा आहे 
GFX OUT 


खरंतर आमिर आणि गौरीची ओळख २५ वर्षांपूर्वीच झाली होती, मात्र दोघंही कामात व्यस्त असल्यानं नंतर संपर्क तुटला. गेल्या काही वर्षांपासून दोघं पुन्हा संपर्कात आले.. आणि दीड वर्षापूर्वी त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं.  


आमिर त्याच्या रिलेशनशिप्सबद्दल नेहमीच खूप पारदर्शक राहिला आहे 


१९८६मध्ये अवघ्या २१व्या वर्षी आमिर आणि रीना दत्ता यांनी पळून जाउन लग्न केलं होतं. त्यानंतर दोन वर्षांनी आमिरचा कयामत से कयामत तक हा पहिला चित्रपट रिलीज झाला, आणि आमिर रातोरात सुपरस्टार झाला. 


आमिर आणि रीनाला दोन मुलं.. मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा. मात्र १६ वर्षं एकत्र राहिल्यावर २००२मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.. 


असं म्हणतात की या घटस्फोटाचं कारण होती किरण राव.. किरण ही लगान चित्रपटात दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांची असिस्टंट होती. लगानच्या सेटवरच दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले, नंतर त्याचं रुपांतर रिलेशनशिपमध्ये झालं... आणि २००५मध्ये त्यांनी लग्न केलं. 


२०११ मध्ये त्यांना सरोगसीनं मुलगा झाला.. दोघांनी त्याचं नाव ठेवलं आझाद.. आझाद राव खान. आझाद ११ वर्षांचा असताना, म्हणजेच २०२२मध्ये आमिर आणि किरण देखील विभक्त झाले. 


मात्र त्यानंतरही आमिर नियमितरित्या किरणच्या संपर्कात असतो. घटस्फोटानंतरही आम्ही एकाच घरात राहायचो.. किरण वरच्या मजल्यावर आणि मी खालच्या मजल्यावर असं आमिरनंच एका मुलाखतीत सांगितलं होतं. 


त्याचप्रकारे, पहिली पत्नी रीनाशी देखील आमिरचे आजही उत्तम संबंध आहेत. तिच्याबद्दल आमिर नेहमीच आदरानं बोलतो.. 


आणि आता आमिरच्या आयुष्यात पुन्हा एक स्री आलीये.. त्याची कुणकुण माध्यमांना अनेक महिन्यांपासून होती.. मात्र गुरुवारी आमिरनंच त्याची घोषणा केल्यानं एकप्रकारे सस्पेन्स दूर झाला असंच म्हणायला हवं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Aamir Khan Love Story | वयाची साठी, प्रेमाच्या गाठी; अमिरची नवी गर्लफ्रेंड कोण? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.