Aadivasi Students Caner Special Report : आदिवासी विद्यार्थ्यांना कर्करोगाचा विळखा
abp majha web team | 29 Aug 2023 11:09 PM (IST)

व्यसन..मग ते कुठलंही असो वाईटच.. तंबाखू, गुटखा किंवा दारुच्या व्यसनामुळे लाखमोलाचं शरीर कसं मातीमोल होतं याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत.. मात्र तरीही काहींची सवय सुटत नाही. पण आता आम्ही व्यसनासंदर्भातली जी बातमी तुम्हाला दाखवणार आहोत, ती धक्कादायक आहे.. त्याचं कारण म्हणजे व्यसन करणाऱ्यांचं वय. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन लागलंय. त्यामुळे या विद्यार्थ्यांभोवती कर्करोगाचा विळखा पडलाय.