Sachin Vaze Case : सचिन वाझे यांच्याकरीता उध्दव ठाकरे - आदित्य ठाकरे यांचा आग्रह? Special Report
abp majha web team | 02 Feb 2022 10:56 PM (IST)

Parambir Singh : सचिन वाझे आणि अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता असा जबाव ईडीला दिला आहे. यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती असा जबाब परमवीर सिंह यांनी ईडीला दिला आहे. त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमवीर सिंह यांनी म्हटले. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे.