Mahalakshmi Race Course Special Report : महालक्ष्मी रेसकोर्सवरून राजकारण तापलं, ठाकरे-शिंदे भिडले
abp majha web team | 31 Jan 2024 11:32 PM (IST)
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या (Mahalaxmi Racecourse) 120 एकरच्या भूखंडावर 'थीम पार्क' (Theme Park) उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. इथं थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं. सुनावणीनंतर तूर्तास 'थीम पार्क'बाबत कोणताही निर्णय घेऊ नये, या अंतरिम मागणीवर आम्ही निर्देश देऊ असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय.