Adeno viruses Special Report :बाल रुग्णालयात लहान मुलांच्या आजारामुळे गर्दी, एडेनो व्हायरसची लाट
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 11:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील बाल रुग्णालयात लहान मुलांच्या आजारामुळे मोठी गर्दी झालेली दिसतेय... याचं कारण, सध्या राज्यात चार विषाणूंचा संसर्ग वाढलाय. २०१९ नंतर एडेनो व्हायरसची एक लाट आलेली पहायला मिळते आहे .या व्हायरसमुळे रुग्णालयं हाऊसफुल्ल झाली आहेत या विषाणूचे डझनभर प्रकार आहेत... परंतु या उद्रेकामागे एडेनो व्हायरस 7 असल्याचे म्हटले जाते. एडेनो व्हायरस 7 विशेषतः धोकादायक आहे...आणि त्यामुळे न्यूमोनियासह मोठ्या श्वसनाच्या गुंतागुंत होऊ शकतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर हा विषाणू हल्ला करतो... ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, भूक न लागणे, थंडी लागणे, शिंका येणे असे त्रास सुरु होतात..