Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत राहिलेली आणि तितकीच वादग्रस्त ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेतले लाभार्थी गेल्या दोन वर्षात कमी होत गेले आणि सध्या समोर आलेली ताजी आकडेवारी अनेक प्रश्नांना जन्म देणारी ठरलीय. मूळ योजनेत असणाऱ्या लाभार्थ्यांपैकी तब्बल ३८ टक्के लाभार्थी आता योजनेतून बाहेर पडल्यामुळं सरकारी कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमकं काय घडलंय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपासून चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना आता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ९२ लाख हा आकडा.
हा आकडा आहे आतापर्यंत योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांचा.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आता तब्बल ३८ टक्क्यांनी घटलीय.
दोन कोटी चाळीस लाख मूळ लाभार्थ्यांपैकी ९२ लाख लाभार्थी या योजनेतून बाहेर पडल्याचं स्पष्ट झाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं योजनेच्या हेतूवर पुन्हा एकदा शंका उपस्थित केलीय.