Delta Plus Variant : महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण,महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध?
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 24 Jun 2021 11:19 PM (IST)
नवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशनंतर आता देशाच्या इतर भागातही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना, विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना खबरदारी घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.