Temple Act Special Report : काय आहे 1991 चा धार्मिक स्थळ कायदा? ज्ञानवापी सर्वेक्षण मागणीनंतर चर्चा
abp majha web team | 17 May 2022 11:23 PM (IST)

ज्ञानवापीचा प्रश्न चिघळला आणि १९९१च्या कायद्याची चर्चा सुरु झाली. तो कायदा आहे १९९१चा 'धार्मिक स्थळ कायदा'. जेव्हा मशिदीतील सर्वेक्षणाची मागणी सुरु झाली तेव्हा सर्वात पहिले समोर आले एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि त्यांनी १९९१च्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली.