Special Report : खंडणी म्हणून मागितलं मुंडकं... सूडबुद्धीतून हत्या, 15 वर्षांच्या जीवाचा बळी
सरीता कौशिक, एबीपी माझा | 12 Jun 2021 12:38 AM (IST)
नागपूर : तुझ्या दिराचं मुंडकं छाट आणि त्याचा फोटो मला व्हॉट्सअॅप वर टाक नाहीतर तुझ्या मुलाला मारून टाकीन, असं एका आईला फोन करून धमकावणाऱ्या व्यक्तीने चौदा पंधरा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारून टाकल्याची घटना नागपूरात घडली आहे. सूरज साहू असे आरोपीचे नाव असून राजीव पांडे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.