Kolhapur : कत्तलखान्यातून 135 वासरांची सुटका, वासरांना कत्तलखान्यात नेलं कुणी?
विजय केसरकर, एबीपी माझा | 05 Dec 2021 08:45 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव याठिकाणी कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या 135 वासरं आणि रेडकांची सामाजिक संघटनांनी सुटका केलीय.अतिशय धक्कादायक घटनेची माहिती जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला नव्हती याचे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.ही वासरं आणि रेडकं इतकी लहान आहेत की अनेक वासरांची नाळ देखील पडली नाही.त्यामुळं या मुक्या आणि चिमुकल्या प्राण्यांचं हाल पाहवेना झाले आहेत.