गोंधळ,राडा, निलंबन! महाराष्ट्र विधानसभेत गैरवर्तनाच्या आरोपामुळे भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित
राजू सोनावणे | 05 Jul 2021 10:49 PM (IST)
मुंबई : विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर भाजपने बहिष्कार टाकला आहे.