TOP 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 06 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक, बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण.
शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत मिळालेलं यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधूक, राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा मतदारसंघात घेणार जनमताचा कौल, अजित पवारांसमोर आमदार वाचणार अडचणींचा पाढा.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार, उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता.
महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील पराभवाची कारणं जाणून घेतली, राज्यातील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची नेत्यांची माहिती.
आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना भेटून सेटिंग तर करत नव्हते ना, याचाही शोध घेण्याची गरज. अन्यथा ऐन विधानसभा निवडणुकीत विश्वासघात होऊ शकतो, रोहित पवारांनी व्यक्त केली भीती.
राज्यात मविआला मिळालेला विराट विजय हा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या संघर्षाचा, आणि स्वाभिमानी जनतेचा. रोहित पवारांची एक्स माध्यमावर पोस्ट.
पुन्हा येईन, पुन्हा येईन, लोकांची घरे, पक्ष फोडून येईन असे गळा फाडून सांगणारे आता मला जाऊ दे ना घरी, वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत. संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका.